०९ नोव्हेंबर, २००७

गमभन विकी

http://tinyurl.com/2zfq7l

या पानावर आपल्याला हिंदी, इंग्रजी शब्द देवनागरीत लिहिलेले दिसतील. त्यातील नको असलेले शब्द काढून टाकावेत. त्यासाठी "edit" या लिंकवर टिचकी द्या. विकिपीडिया यापूर्वी वापरलेला असेल तर आपण ही सुविधा सहज वापरू शकाल. त्यासाठी सदस्य बनण्याचीही आवश्यकता नाही. पण आल्याची नोंद करून आपण बदल केले तर आपण कुठे कुठचे बदल करत आहात याची नोंद आपोआप ठेवली जाईल व आपल्यालाच त्याचा उपयोग होईल.
याचा गैरवापर होण्याची शक्यता ध्यानात घेऊन या विकित जमा होणारे शब्द हे शब्दसंपदेच्या संपादकांना पुन्हा एकदा अवलोकनार्थ उपलब्ध करून दिल्यावरच त्यांचा समावेश कोशात होईल.