१७ नोव्हेंबर, २००७

व्यावहारिक मराठी शब्दार्थ कोश

वयाची आठ दशके उलटलेले भाटवडेकर काही वर्षांपूवीर् हा ४५ हजार शब्दांचा कोश करायला बसले तेव्हा त्यांनी सगळ्या मराठी दैनिकांचा, नियतकालिकांचा कसून अभ्यास केला. बातम्या, लेखांमध्ये वापरला जाणारा प्रत्येक शब्द या कोशात आला पाहिजे, असा निकष ठेवला. याशिवाय, मराठी माध्यमाच्या पहिली ते बारावीच्या प्रत्येक विषयाच्या पुस्तकातील हरेक शब्दही कोशात घेतला.
अनेक वषेर् खपून भाटवडेकरांनी सिद्ध केलेला हा 'व्यावहारिक मराठी शब्दार्थ कोश' राजहंस प्रकाशन प्रकाशित करत आहे.

म.टा.तली मूळ बातमी