०८ नोव्हेंबर, २००७

सवाल - जवाब

१) काही प्रचलित इंग्रजी शब्द जसे, बॅंक, टेबल, पेपर, पेन, पेन्सिल यांचा शब्दसंपदेत समावेश करायचा का?
होय.

२) नाव, आडनाव व गावांची नावे घ्यावीत का?
होय!

३) काही अप्रचलित मराठी शब्द जे केवळ शब्दकोशातच पाहावयास मिळतात व आपल्या नेहमीच्या संभाषणात येत नाहीत असे शब्द जमा करावे का?
नाही. अशिष्ट शब्द (शिव्या) देखील जमा करू नयेत. सुंदर मराठी शब्दांखाली पर्याय म्हणून अशिष्ट शब्द केवळ उच्चार साधर्म्यामुळे दिसले तर ते योग्य होणार नाही.

४) माझ्या मित्राला / मैत्रिणीला यात सामील करून घेऊ का?
ई-मेल पाठवा ओंकार जोशी यांना, विषयः "shabdasampada - madatanis" to josh9383@gmail.com

५) 'च' चे काय करायचे?
'च' सोबत 'ही' आणि 'सुद्धा'ही जोडता येते सर्व शब्दांना. त्यांचे काय करायचे ते नवीन लेख लिहून सांगेनच. तोवर च सोबत अथवा च शिवायचे सर्व शब्द संपदेत जमा करता येतील. पूर्णविराम व कोलन असलेले शब्द जसे... पीएच.डी. प्रात:काल प्रात:स्मरण जमा करू नयेत.

६) ध्येयवाक्य?
'स्वभाषेत टंकलेखन साहाय्य'