२८ जानेवारी, २०२१

निवडक शब्दसंपदा

"जीवाला” या शब्दाला पर्याय म्हणून "जुवाला" असा शब्द दिसत आहे. याचे कारण "जू” या मूळ शब्दाचे एकवचनी सामान्यरूप "जुवाला”, “जुवाचे” वगैरे होऊ शकते. स्पेल चेक सर्वसमावेशक बनविण्यासाठी जास्तीत जास्त शब्द आणि त्यांची रूपे घेण्याच्या नादात स्पेलचेकची क्वॉलिटी घसरू शकते. त्यासाठी निवडक शब्द आणि त्यांची ठरावीक रूपे घ्यावीत. 

"पंक" या शब्दाचा अर्थ दाते शब्दकोशाप्रमाणे "चिखल” किंवा "साखरेचा पाक” असा होतो. या दोन्हीपैकी कोणत्याच अर्थाने आज तो शब्द वापरात नाही. पंक/f अशी नोंद करून ६४५ शब्द डिक्शनरीत वाढवण्यात काहीही अर्थ नाही. असे बरेच शब्द आहेत ते काढावे लागतील. उदा. “अज/f” याचा अर्थ बोकड असा होतो. हा संस्कृत शब्द असून मराठीत फारसा वापरात नाही. वापरातील शब्दच ठेवणे फार महत्त्वाचे आहे.