१० जानेवारी, २०२१

हंस्पेलमधील रीप्लेसमेंट टॅग

 चुकीच्या शब्दांना योग्य शब्द सुचवताना जे पर्याय येतात ते काही वेळा समर्पक नसतात. "वालवतो" या शब्दाला “वाळवतो” अशी सुचवणी न येता “चालवतो, घालवतो, खालवतो, खालावतो" हे शब्द सुचवले जात आहेत. याचे कारण हंस्पेलने "वालवतो" या शब्दातील "वा” चुकीचा असण्याची शक्यता गृहीत धरली आहे. आता आपण दुसरा शब्द पाहू. "वाडवतात” या शब्दाला “वागवतात वाजवतात वाळवतात वाचवतात" अशी सुचवणी  येत आहे. याचा अर्थ इथे "वा” नव्हे तर "ड” बदलायला हवाय हे हंस्पेलला बरोबर कळले. पण "ड” ला "ढ” हा "ग” अथवा "ज” पेक्षा जास्त जवळचा पर्याय आहे हे त्याला माहीत नाही. त्यामुळे "वाढवतात” हा पर्याय दिसत नाही. लोकं "ढ” च्या ऐवजी "ड” टाईप करतात कारण फोनेटिक मध्ये  "ढ” काढणे हे "ड” पेक्षा जास्त त्रासदायक ठरते. कोणते अक्षर कोणत्या अक्षराला जास्त जवळचे आहे हे हंस्पेलला शिकवण्यासाठी "रीप्लेसमेंट टेबल” चा टॅग वापरता येतो.

REP 9
REP स श
REP स ष
REP श ष
REP प फ
REP ज झ
REP ल ळ
REP न ण
REP त ट
REP ड ढ

"विसरला" हा शब्द "विषरला" असा सहसा लिहला जात नाही. कारण बहुतेक इन्पुट मेथडमध्ये ष हे अक्षर काढण्यासाठी ३ की-स्ट्रोक वापरावे लागतात. पण "विषय" हा शब्द "विशय" असा सर्रास लिहला जातो. त्यामुळे वर दिलेल्या  रीप्लेसमेंट टेबलमध्ये श – ष अशी नोंद असली तरी ष – श अशी नोंद नाही. यात कोणाला काही बदल करायचा असेल तर विकीच्या ह्या पानावर चुकीचा शब्द – बरोबर शब्द – सध्या दिसणारे पर्याय अशी नोंद करावी.  

https://tinyurl.com/replacement-table

रीप्लेसमेंट टेबल हा टॅग वापरून आपण आपला स्पेल चेक अधिक परिणामकारक बनवू शकू.