१९ डिसेंबर, २०१२

स्पेल चेक डिक्शनरीला आपले योगदान

फायरफॉक्स व ओपन ऑफिस दोन्ही मध्ये राईट क्लिक वापरून शब्द डिक्शनरी वाढविण्याची सोय आहे. अशा प्रकारे इतरांनी जमा केलेले शब्द जर मला मिळाले तर मी ते थेट डिक्शनरीत टाकून ही डिक्शनरी अधिक परिणामकारक व सर्वसमावेशक बनवू शकतो. त्यासाठी मला एक फाईल पाठवून द्या.

फायरफॉक्स:
आपण जर फायरफॉक्स वापरत असाल व राईट क्लिक वापरून बरेच शब्द साठवून ठेवले असतील. तर त्या शब्दांचा बॅकअप घ्या व ती फाईल मलाही पाठवा. त्यासाठी Help मेन्यु मधून Troubleshooting Information निवडा आणि मग "Show Folder" बटनावर क्लिक करा.

आता जो फोल्डर उघडेल त्यातील "persdict.dat" या फाईलला कुठेतरी म्हणजे "माय डॉक्युमेंट" वा तशाच एखाद्या ठिकाणी सेव्ह करा व ती फाईल मला इ-मेल करा.
_____

ओपन ऑफिस, लिबर ऑफिसः
यातही आपण राईट क्लिक करून मराठी शब्द साठवलेले असतील. तर मग रायटरच्या Tools - Options - LibreOffice - Paths मध्ये जाऊन अ‍ॅटो करेक्टचा पाथ पाहून ठेवा.


 किंवा start – run च्या डायलॉगबॉक्स मध्ये %APPDATA% असे टाईप करा व "ओके" द्या. आता आपण थेट अ‍ॅप्लिकेशन डाटा या फोल्डरमध्ये पोहोचू.


इथून पुढे \LibreOffice\3\user\wordbook अशा पायर्‍या पार केल्या की standard.txt फाईल दिसेल हीच फाईल मला पाठवा व तिचा बॅक-अप देखील घ्या.


थोडक्यात ओपन ऑफिस वापरत असाल तर standard.dic आणि फायरफॉक्स वापरत असाल तर persdict.dat या फाईलचा बॅकअप घेऊन ठेवा आणि ती फाईल मला पाठवा, या पत्त्यावर shantanu.oak@gmail.com