१० डिसेंबर, २०२३

इंग्रजी शब्द मराठीत लिहिताना परसवर्णाचा वापर

and  अँड किंवा अ‍ॅण्ड तर end हा शब्द एंड किंवा  एण्ड अशा दोन्ही पद्धतीने लिहिता येतो.  माझ्यामते असे शब्द परसवर्ण पद्धतीने लिहावेत.  म्हणजे अ‍ॅण्ड किंवा एण्ड.  तसाही इंग्रजीत परसवर्णाचा उच्चार स्पष्ट होतो.

परसवर्णाच्या बाबतीत महामंडळाचे नियम असे आहेत.
https://tinyurl.com/yc7vtksj

पर-सवर्ण लिहिण्याची सवलत फक्त तत्सम शब्दांपुरती मर्यादित आहे. संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्षबिंदू (अनुस्वार) देऊनच लिहावेत.
उदाहरणार्थ : 'दंगा, झांज, बंड, खंत, संप' हे शब्द 'दङ्गा, झाञ्ज, बण्ड, खन्त, सम्प' असे लिहू नयेत

संस्कृतबरोबर इंग्रजी शब्दांना पर-सवर्ण लिहिण्याची सवलत मिळाली पाहिजे. त्यामुळे ते शब्द परभाषेतले आहेत / मराठी नाहीत हे लिपीमधूनच स्पष्ट होईल. कोणाचा काही आक्षेप नसेल तर स्पेल चेकमधील इंग्रजी शब्द पर-सवर्ण पद्धतीने लिहिले जातील. ज्या शब्दांचे पुरेसे मराठीकरण झाले आहे असे शब्द परत अनुस्वाराने लिहावे लागतील. उदा. पंप हा शब्द पम्प असा सहसा लिहिला जात नाही. कारण तो इंग्रजी शब्द आहे असे आपण मानत नाही!