२४ मे, २०१९

correcting spelling where space is missing

mystring='कारोबारमुंबईसेलेकरगोवातकफैलाहुआहैपूरेइलाक़ेमेंरॉबर्टकाएकछत्रराजहै'

def recursive(mystring):
    for i in range(len(mystring), 1, -1):
        if mystring[:i] in mylist:
            print (mystring[:i])
            mystring = mystring[i:len(mystring)]
            recursive(mystring)
            break

recursive(mystring)

कारोबार मुंबई सेले कर गोवा तक फैला हुआ है पूरे इला

नुक्तावाला क

क ला नुक्ता जोडून जे अक्षर बनते त्याची लांबी दोन भरते तर स्वतंत्र नुक्तावाला क वापरला तर एकाच अक्षराने काम भागते.

क़
U+0915 + U+093C


U+0958

डिक्षनरीत योग्य तो क वापरलेला दिसत आहे. पण टाईप करताना लोक दोन अक्षराचा क वापरत आहेत. हा दोन अक्षरी क बदलून एक अक्षरी करण्यासाठी ही पायथॉन स्क्रीप्ट वापरली. नुक्त्याचा युनिकोड क्रमांक 093C आहे.

mystring='इलाक़े'
len(mystring)
myreplace= {'क़':'क़', 'ख़':'ख़', 'ग़':'ग़', 'ज़':'ज़', 'ड़':'ड़', 'ढ़':'ढ़', 'फ़':'फ़', 'य़':'य़'}
for key in myreplace.keys():
    mystring=mystring.replace(key, myreplace[key])
len(mystring)


२२ मे, २०१९

चतुरंग पुरवणीतील महत्त्वाचे लेख

राजन गवस यांचा आवर्जून वाचावा असा लोकसत्तेतील चतुरंग पुरवणीतील लेख (सुत्तडगुत्तड : मुक्त लेक)
https://www.loksatta.com/chaturang-news/suttadguttad-article-about-author-rajan-gavas-8-1891591/

यातील काही भाग फार महत्त्वाचा…
सावित्रीच्या लेकी महाराष्ट्रभर कर्तृत्व गाजवत आहेत. याबाबत भरभरून बोललं, वाचलं, लिहिलं जातं. पण हे सर्व होत असताना त्यांच्या आरोग्याबाबत, मानसिकतेबाबत कोणीच काही ध्यानात घ्यायला तयार नाही. हा खरा चिंतेचा प्रश्न आहे. पालक, शाळा, समाज सारेच मुलींच्या आरोग्याबाबत काही विचार करत आहेत याचे कुठं काही तपशील येतात असे चित्र नाही. तिनं गल्लीत खेळायचं नाही. घरात खेळायचं नाही. शाळेत तर खेळायला जागाच नाही. अशा वातावरणात पोरीच्या आरोग्याचं होणार तरी काय?
ते खेळ, ती गाणी, ते वाढणं, रांधणं टाकून द्यावं वाटत असेल, तर टाकून द्या. झिम्माफुगडी कालबाह्य वाटत असेल तर खेळू नये. पण त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था आपण काही निर्माण केली का? नवं संगोपनशास्त्र विकसित केलं का? याचं उत्तर नकारार्थीच येतं. त्यांच्या संगोपनाबाबत घरातील पालकांनी आणि शाळेतल्या शिक्षकांनी स्वतःचे परंपरागत दृष्टिकोन बदलायला पाहिजेत. जेव्हा तुम्ही जुने खेळ सहज टाकून देता तेव्हा जुने दृष्टिकोन नको का टाकून द्यायला. मुलगी म्हणजे परक्या घरचं धन. बाईच्या जातीनं असं करून कसं चालेल. बाई म्हणजे काचेचं भांडं. आमच्या घरची अशी रीत, तशी रीत. हे सगळं बाजूस सारल्याशिवाय मुलीचं संगोपन कसं होईल नीट.
_____

नीरजा यांचा विचार करायला लावणारा  लोकसत्तेतील चतुरंग पुरवणीतील लेख (तळ ढवळताना : डिस्कनेक्ट होण्याच्या काळात..)
https://www.loksatta.com/chaturang-news/tal-dawaltana-article-by-neerja-9-1891601/
यातील काही भाग फार महत्त्वाचा…

 ‘व्हॉट्स अ‍ॅप’मुळे सकाळच्या ‘गुड मॉर्निग’नं दिवसाची सुरुवात व्हायला लागली आणि रात्री ‘शुभरात्री’ म्हणत झोपायला लागलो. फार पूर्वी कधी तरी इंजिन सोडून यार्डात गेलेले डबे पुन्हा एकदा जोडले गेले आणि आमची ट्रेन एका छानशा सफरीला निघाली. पण ही सफर वाटली होती तेवढी प्रसन्न नाही राहिली.  वादाच्या ठिणग्या पडायला लागल्या. काहींनी ग्रुप सोडला, काही ग्रुपवर राहूनही कायमचे मुके झाले तर काही नित्यनेमाने एक आन्हिक म्हणून प्रत्येक वाराबरोबर बदलणाऱ्या देवदेवतांच्या प्रतिमा, कधी साईबाबा तर कधी स्वामी समर्थ मग त्याच्या जोडीला स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, भगतसिंग, क्वचित कधी तरी जोतीबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, नाही तर थेट नाना पाटेकर, विश्वास नांगरे पाटील वगैरेच्या नावावर खपवल्या गेलेल्या संस्कारांचं भरघोस पीक, सुविचारांची उधळण, कधी ‘कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन’ म्हणत जुन्या दिवसांच्या काढलेल्या आठवणी, वेगवेगळ्या दिवसांच्या, सणावाराच्या शुभेच्छा, बायकोच्या (कथित) हुकूमशाहीवरचे विनोद, आणि जोडीला ‘मेरा भारत महान’च्या घोषणा!
आज इतिहास जाणून घेण्यासाठी खोल आणि विस्तृत पट उलगडून दाखविणारी पुस्तकं वाचण्याची गरज असते हे वेळ नसलेली आणि वाचनाची सवयच नसलेली माणसं विसरून गेलेली आहेत. आता केवळ सीमेवरच सैनिक लढताहेत असं नाही. तर प्रत्येक घराची रणभूमी झाली आहे. अलीकडे तर अनेक ‘फेसबुक’ व ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ग्रुपवर युद्धसदृश स्थिती आहे. फुलापानांनी आणि सुंदर सुविचारांनी भरलेला ‘व्हॉट्स अ‍ॅप’चा अवकाश हळूहळू हिंसक रंगांनी भरायला लागला. समाजमाध्यमांमुळे सोपं झालं आहे कनेक्ट होणं एकमेकांशी. पण मनानं डिस्कनेक्ट होत चाललो आहोत कायमचे, त्याचं काय करायचं राव! 

११ ऑक्टोबर, २०१८

Suffix rules added

The following words were added to the dictionary.

मूल
मुला/ek
मुलां/an
घोडा
घोड्या/ek
घोड्यां/an

ek stands for singular (ekvachan) and an stands for plural (anekvachan)
The invalid vibhakti Pratya were removed.

All singular words
मुलास, मुलाला, मुलाते, मुलाने, मुलाए, मुलाशी, मुलाऊन, मुलाहून, मुलाचा, मुलाची, मुलाचे, मुलात, मुलाइ, मुलाआ

valid
मुलास, मुलाला, मुलाने, मुलाशी, मुलाहून, मुलाचा, मुलाची, मुलाचे, मुलात,

invalid
मुलाते,  मुलाए,   मुलाऊन,  मुलाइ, मुलाआ
_____

All Plural words
मुलांस, मुलांला, मुलांते, मुलांना, मुलांनी, मुलांशी, मुलांई, मुलांही, मुलांऊन, मुलांहून, मुलांचा, मुलांची, मुलांचे, मुलांत, मुलांइ, मुलांआ, मुलांनो

valid
मुलांस, मुलांला,  मुलांना, मुलांनी, मुलांशी, मुलांही,   मुलांहून, मुलांचा, मुलांची, मुलांचे, मुलांत,  मुलांनो

invalid:
मुलांते,  मुलांई, मुलांऊन, मुलांइ, मुलांआ,

The rules look like this...

SET UTF8
ICONV 1
ICONV ’ '
FLAG long

SFX an Y 12
SFX an 0 स .
SFX an 0 ला .
SFX an 0 ना .
SFX an 0 नी .
SFX an 0 शी .
SFX an 0 ही .
SFX an 0 हून .
SFX an 0 चा .
SFX an 0 ची .
SFX an 0 चे .
SFX an 0 त .
SFX an 0 नो .

SFX ek Y 9
SFX ek 0 स .
SFX ek 0 ला .
SFX ek 0 ने .
SFX ek 0 शी .
SFX ek 0 हून .
SFX ek 0 चा .
SFX ek 0 ची .
SFX ek 0 चे .
SFX ek 0 त .

२८ सप्टेंबर, २०१८

नेहमी चुकणारे शब्द


करित करीत
हिंदूधर्मातून हिंदुधर्मातून
मुळच्या मूळच्या
सहस्त्रावधी सहस्रावधी

अध्यात्मिक आध्यात्मिक 
कोट्यावधी 

सहस्त्रावधी 

२१ सप्टेंबर, २०१८

गंडलेला ऍटो करेक्ट

यातील ऍटो करेक्ट काही शब्दांच्या बाबतीत गंडलेला आहे. त्याची काही उदाहरणे.
दृष्टीकोन हा शब्द दीर्घ लिहीला तर तो ऱ्हस्व होतो आणि ऱ्हस्व लिहीला तर दीर्घ!

ओळखून - ओळ्खून
करते - कर्ते
परत - प्रत
पर - प्र
दृष्टिकोन - दृष्टीकोन
दृष्टीकोन - दृष्टिकोन
यातून - यातुन
यातुन - यातून 
दीर्घकाळ - दिर्घकाळ
दिर्घकाळ - दीर्घकाळ


हे शब्द सोर्स कोडमध्ये बदलावे लागतील.

हे शब्द शुद्ध लिहीले तर ऍटोकरेक्टने अधुद्ध होतात. हे सुधारले पाहिजे.
दृष्टीने
प्रतीकात्मक
हळूवारपणे
रूप
राहीले
शारिरीक

०९ नोव्हेंबर, २०१४

से नो टू जंक

आजच्या लोकसत्ता - लोकरंग पुरवणीतील वैद्य सुचित्रा कुलकर्णी यांचा आहारावरचा लेख फारच छान.

http://www.loksatta.com/lokrang-news/to-stop-acidity-1039776/?nopagi=1

त्यातील काही महत्त्वाची वाक्ये अशी:
आजची बाल आणि युवा पिढी यांचा आहार पोषक नाही हेच खरं आहे. चॉकलेट्स, वेफर्स, आइस्क्रीम, पाव, बेकरीचे म्हणजे मद्याचे पदार्थ, शीतपेये, पाणीपुरी-शेवपुरी असे चाट पदार्थ, बर्गर, विविध चवींचे सॉस, मिओनीज, न्यूडल्स या सगळ्या पदार्थामध्ये शरीराला वापरता येतील असे पोषक घटक नगण्य असतात. यातले काही पदार्थ तर नैसर्गिक नाहीतच, कृत्रिम आहेत. त्यामुळे त्यांचं काय करायचं हे शरीराला कळतच नाही. त्यातलाच काही भाग ते नाइलाजानं ठेवून घेतात, (रमीच्या डावात हवी ती पानं येत नसतील तर आपण नाही का आलेली निरुपयोगी पानं ठेवून घेतो..) साठवतात आणि वजन वाढू लागतं.

मुलांच्या लहानपणापासूनच पालकांनी जागरूक राहायला नको का? लाड म्हणून, आम्हाला मिळालं नाही म्हणून, सगळं खाण्याची सवय हवी म्हणून, जवळ पैसे आहेत म्हणून, मुलांना आवडतं म्हणून - अशी तद्दन भंकस कारणं पुढे करून या कचऱ्याची/ विषाची चटक मुलांना कोण लावतं? आई-बाप झाल्यावरही आपल्याला जर आहाराबाबत योग्य-अयोग्य ठरवता येत नसेल, तर बिचाऱ्या मुलांना इतक्या लहान वयात सांगितल्याबरोबर ते कळेल आणि वळेल अशी अपेक्षा आपण कशी काय करू शकतो? मग यावर उपाय काय? तर या पदार्थांना उत्तम पर्याय असे घरगुती, ताजे, पोषक आणि चविष्ट पदार्थ सगळ्या मातांनी ते बनवले पाहिजेत.

सायलीसारख्या मुलींच्या अग्नीची वाट लावणारा मुख्य घटक म्हणजे व्यायामाचा अभाव. 'मार्कांच्या स्पर्धेत उतरवलेल्या आपल्या पाल्यानं अभ्यासाशिवाय इतर कुठलेही 'फालतू' उद्योग (व्यायाम, घरकाम, स्वतःची कामं, खेळ, चालत शाळेत जाणं) केलेले आजच्या महत्त्वाकांक्षी पालकांना अजिबात खपत नाही.

औषधं, पंचकर्म याद्वारे इलाज करता येतात. पण ते खूप वेळखाऊ असतात आणि रुग्ण ते गांभीर्यानं घेत नाहीत. लहानपणापासून योग्य आहार ठेवला तर कित्येक आजारांपासून आपल्या मुलांना दूर ठेवता येऊ शकतं. आरोग्याच्या बाबतीत नेहमीच 'तहान लागण्यापूर्वी विहीर खणणे' इष्ट. 
_____

खरोखर डोळ्यात अंजन घालणारा लेख आहे हा.
मुळातूनच सगळा वाचायला हवा असा.

जंक फुड खाण्यापूर्वी मी माझीच अशी समजूत करून घेत असे की "कधीतरी खायला काय हरकत आहे? आपण काय रोज थोडीच खातो ह्या गोष्टी?" पण आता हिशोब करतो तेव्हा लक्षात येते की जंक फुडचे हजारो प्रकार. एकच ईश्वर पण त्याची खूप नावे, तसा काहीसा हा प्रकार. वर्षातून एक, दोनदाच खायचे म्हटले तरी कित्येक वर्ष पुरतील इतक्या व्हरायटीने सगळे मॉल ओथंबून वाहताहेत. यातून बाहेर पडायचा एकच उपाय, "से नो टू जंक फूड" गाई म्हशींसकट सगळं प्राणी जगत आपलं अन्न ओळखतं आणि बाकीच्या गोष्टींना तोंड लावत नाही. आपण मात्र पुढे येईल ते पोटात ढकलतो! आहार हाताबाहेर जाण्यास आपले संस्कारही कारणीभूत आहेत. यातील मुख्य नऊ:

१) पानात काहीही टाकायचं नाही.
२) सगळं पचलं पाहिजे, नसेल पचत तर सवय करायची.
३) रोज नाही, पण कधीतरी खायला काय हरकत आहे?
४) शिपीभर अन्न पातेल्यात उरता कामा नये. केलेलं सगळं संपलं पाहिजे.
५) तो बघ. तुझ्या एवढाच आहे. पण त्याचे खाण्यापिण्याचे काही नखरे नाहीत. एकदम आदर्श मुलगा !
६) आपल्यात (आपल्या जातीत) हे खात नाहीत किंवा हा पदार्थ असाच करतात.
७) असली थेरं इथे चालणार नाहीत. खाण्यापिण्यावर असा खर्च केला असता तर आमचा संसार झाला असता का?
८) पालेभाजी धुवा, निवडा, चिरा म्हणजे खूप व्याप. पालेभाजीला श्रम आणि वेळ जास्त लागतो. त्यापेक्षा वांगं, बटाटा, भेंडी अशा फळभाज्या बर्‍या पडतात करायला. त्यालाही वेळ नसेल तर नाक्यावर मिळतात हल्ली सगळ्या भाज्या, रेडिमेड. ४० रुपये प्लेट म्हणजे थोड्या महाग पडतात, पण वेळ (त्यापेक्षा श्रम) वाचतात. ते महत्त्वाचे.
९) आज मिळतंय ते खाऊन घे. उद्या कदाचित हे देखील मिळणार नाही.

काही दुकानांमध्ये "कृपया इन शब्दोंका प्रयोग मत किजीये" अशी विनंती करणारा एक फलक असतो. त्यात "पहचानता नहीं क्या? , पैसा कल देता हूं, लिख लेना" अशी वाक्ये असतात. तसा घरात एक बोर्ड बनवायला हवा. वर दिलेली ९ वाक्ये उच्चारू नयेत असा!