पंच फोरन हे पाच मसाल्यांचे मिश्रण पूर्व भारतात विशेषतः बंगालमध्ये वापरले जाते. यात बडीशेप, मेथी, जीरे, मोहरी आणि कलोंजी या बिया समप्रमाणात भाजून त्याची पूड करतात. हा मसाला, गरम मसाल्यासारखाच कुठेही वापरता येतो. यात मेथीचे दाणे थोडे कमी घातले तरी चालतात. (इतर मसाल्यांच्या मानाने निम्मे). हा मसाला स्वादीष्ट तर आहेच पण आरोग्यासही हितकारक ठरतो. कलोंजीच्या बिया महाराष्ट्रात फारशा वापरात नाहीत. पण आता त्या सगळीकडे मिळतात. हायपरसिटी किंवा डी-मार्ट मध्ये तर हमखास. तर मग ट्राय करुया पंच फोरन.
१० जुलै, २०१४
०३ जुलै, २०१४
भविष्यातील नवी आव्हाने
जीवघेणी स्पर्धा, वैचारिक कट्टरता आणि भविष्याबद्दलची अनिश्चितता या तीन गोष्टींशी नवीन पिढीला सामना करावा लागणार आहे. खूप स्पर्धा निर्माण झाली की तिला गळेकापू (cut throat) म्हणतात. "गळेकापू" या शब्दातच हिंसा आहे. अशी स्पर्धा केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही असे प्रत्येकाच्या मनावर बिंबवले जात आहे आणि त्यामुळे ज्याला त्याला जिथे तिथे घुसण्याची घाई झाली आहे. विरोध सहन न होण्याची असहिष्णुता ही आहे आजची नवीन फॅशन. धर्म, जात, भाषा या सर्व बाबतीत कडवेपणाचा स्विकार केला तर काय होईल? आपल्या अनुभवाचा परीघ लहान होत जाईल. आपण आपल्याच नकळत संकुचित विचारांचे बनू आणि आपलेच नुकसान होईल. इंग्रजीला विरोध केला तर तंत्रन्यानात मागे पडू. "लुंगी हटाव" अशी घोषणा देत दाक्षिणात्यांना विरोध केला तर तिकडच्या सुंदर मंदिरांचा आणि भोजनाचा आस्वाद घेताना आपण काहीतरी चुकीचे करत आहोत असे आपल्याला वाटेल. हिंदू धर्मात अनेक जाती/ पंथ आहेत. प्रत्येकातून काहीतरी शिकण्यासारखे आहे. प्रजापिता ब्रम्हाकुमारीचा पंथ असेल तर त्यातून स्वच्चता आणि अन्नाची शुद्धता शिकता येईल. रामदेव बाबाकडून योग शिकूया तर पंढरीच्या वारकर्यांकडून समानता आणि निर्व्यसनी रहायला शिकेन अशी द्रूष्टी हवी. आता त्या पंथातही काही चुकीच्या गोष्टी होत असतीलच, पण आपली नजर फक्त जे उज्जव आणि भव्य असेल त्याकडे हवी. काय स्वीकारायचे ते शिकायला हवे. ड्न्य्हानेष्वरीत फार सुंदर उपमा आहे. गाईच्या आचळाला चिकटलेले गोचीड काय पिते? तर रक्त. दुधाच्या इतके जवळ राहून दूध न पिता रक्त पिण्याची बुद्धी गोचीडाला का व्हावी? आपल्याही आजूबाजूला मंगल, उदात्त, भव्य आणि आशादायक गोष्टी आहेत त्या न पाहता फक्त कचराच का पाहायचा?
आज अशी परिस्थिती आहे की भविष्यात सगळं चांगलंच होईल असं ग्रूहीत धरून चालता येणार नाही. कदाचित काही जुनी माणसं म्हणतात तसं "गेले ते दिवस बरे होते" असे म्हणण्याची देखील वेळ येऊ शकते. पण कशाही परिस्थितीला तोंड देता आले पाहिजे. सुखाच्या आणि दु:खाच्या लाटांमधून पोहून कसं पार व्हायचं याचं शिक्षण आपल्याला मिळालं पाहिजे. ते घरी, शाळेत, क्लासमध्ये आणि जगाच्या शाळेत असं शिक्षण मिळतं. ते शिकता मात्र आलं पाहिजे. आपल्याला ते शिकता येत नाही याचं महत्त्वाचं कारण आपल्याला त्या न्यानाबद्दल व ते शिकवणार्या गुरुंबद्दल आदर नसतो. गीतेमध्ये कृष्णाने सांगितले आहे की "इदं तु ते नातपस्काय, नाभक्ताय कदाचन". भक्ति आणि तपस्वी नसेल त्याला हे सांगू नको. का? कारण अशी लोकं आपल्यालाच शिकवतील आणि आपला मुद्दा कसा चूक याचा कीस काढत बसतील. म्हणतात ना, "तुटे वाद, संवाद तो हीतकारी". वाद नको, संवाद हवा, ज्यात दोघांनाही काहीतरी लाभ होईल. संवाद वाढवायचा तर मन आकाशासारखं खुलं ठेवायला हवं. कुजक्या डोक्यानं जे होतं त्याला भांडण, वितंडवाद म्हणतात आणि त्याचं पर्यवसन द्वेष आणि मत्सरात होतं. मला असं सांगितलं गेलं आहे की हल्ली शाळेत शिक्षक वर्गावर येतात आणि विद्यार्थांकडे न बघता शिकवतात मग निघून जातात. जर संवाद साधला नाही तर ते एकतर्फी शिक्षण होईल. त्यातून कदाचित मुले पास होतील पण ती विकसित, जबाबदार आणि लोकप्रिय नागरिक बनणार नाहीत.
भविष्यातील नवी आव्हाने स्विकारण्याची शक्ति आणि बुद्धी आपल्या सर्वांना मिळो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.

०५ जुलै, २०१३
विद्यार्थीदशेतील प्रवेशाचे स्वागत
माझा सगळ्यात पहिला सल्ला म्हणजे बोलताना शिव्या देता कामा नये. प्रत्येकाचा आदर करायला हवा. आपण जेव्हा शिवी देतो तेव्हा संवादाचा एक मोठा मार्ग आपण आपल्या हाताने बंद करतो. संवाद संपला की शिक्षण संपतं. आणि शिक्षण संपलं की माणूस म्हातारा बनतो. म्हणून शिव्यांपासून लांब राहा. जर सगळे मित्र असंच बोलत असतील तर कोणाशीही मैत्री न करता एकटं राहायची तयारी ठेवा. कोणत्याही धर्मात सुसंगतीचे महत्त्व सांगितले आहे ते यासाठीच.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत शिकत राहा. आणि शिकण्यासाठी चांगली शाळा, चांगलं कॉलेजच पाहिजे असं नाही. आपल्या आजूबाजूचं जग हीच एक मोठी शाळा आहे. एका कवीने म्हटले आहे. "जग हे बंदिशाळा, जग हे बंदिशाळा ! कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला" जग म्हणजे एक तुरुंग आहे असं वाटणं ही कविकल्पना आहे. जग म्हणजे बंदिशाळा नव्हे तर एक मोठी शाळा म्हणजे university आहे. ज्यात वाईट लोकं आहेत तशीच चांगली लोकं आहेत. एरवी चांगली वागणारी लोकं काहीवेळा भलतंच वागतात, बोलतात. त्यामागेही काहीतरी कारण असतं. प्रत्येक माणसाचा स्वतःचा असा "पॉइन्ट ऑफ व्ह्यू" असतो. तो समजावून घेणं म्हणजे जगाच्या युनिव्हर्सिटीत शिकण्यासारखं आहे. रिक्षा ड्रायवरकडून ट्राफिकमधून मार्ग कसा काढायचा हे शिकूया. वाण्याच्या दुकानात किंवा मॉलमध्ये काम करणाऱ्यांकडून वजन कसं करायचं आणि वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू व्यवस्थित कशा पॅक करायच्या हे नुसतं बघून शिकता येतं की नाही? कधी मोठ्या हॉटेलात गेलो तर तिथली स्वच्छता आणि टिश्यू पेपरचा वापर कसा करायचा हे शिकण्यासारखं वाटत नसेल तर आपण आदर्श विद्यार्थी बनू शकणार नाही. हे शिकून काय करायचं आहे? मला काही हॉटेलात काम करायचं नाही, असा द्रूष्टीकोन ठेवू नका. शिक्षण कधीही वाया जात नाही. ते कधीना कधी आपल्या उपयोगी पडतं.
तिसरी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान फार झपाट्याने विकसित होत आहे आणि त्याचा वेग यापुढे सतत वाढत राहणार आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार मोकळ्या मनाने करायला हवा. मोबाईल आणि इंटरनेट ही या टेक्नोलॉजीची साधने आहेत. ती वापरायला शिकायला हवे. पण त्यांच्या आहारी जाता कामा नये. फेसबुक म्हणजे काही जग नव्हे. फेसबुकवर "लाईक" करणारी लोकं प्रत्यक्षात "हेट" करतात. हे समजेपर्यंत काही वेळा उशीर होतो. आभासी जग आपल्यापरीने आनंद देत असते पण तो आनंद व्यसनातून मिळणार्या आनंदासारखा क्षणिक असतो. अशा आनंदाचा शेवट चटकन आणि दु:खकारक होऊ शकतो. म्हणून तंत्रज्ञान वापरताना त्याचा उपयोग नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि आपलं जीवन अधिक व्यवस्थित आणि "ऑर्गनाइज्ड" व्हावा यासाठी केला पाहिजे. त्यासाठी इंटरनेटवर इमेल आहे, कॅलेंडर आहे, आपला डेटा कायमचा सुरक्षित ठेवण्याचीही सोय आहे. हे सर्व न वापरता फेसबुकवर वेळ घालवणं आणि कॉम्प्युटरवर गेम खेळणं म्हणजे एखादं विमान विकत घेऊन त्याचा उपयोग आकाशात उडण्यासाठी न करता घसरगुंडी म्हणून वापरल्यासारखं आहे.
चौथा नियम जो आपण लहानपणापासून पाळायला हवा, तो म्हणजे आपला रोजचा खर्च एका कागदावर लिहायचा. मी हा नियम फार उशिरा शिकलो. त्यापूर्वी आपण वायफळ खर्च करत नाही मग आपल्याला पैसे का पुरत नाहीत असा मला नेहमी प्रश्न पडायचा. मग मी संध्याकाळी किंवा रात्री दिवसभरात केलेला खर्च एका कागदावर लिहायला लागलो. मग माझ्या लक्षात आले की रिक्षावर इतका खर्च का होतो? कारण निघायला उशीर झालेला असतो. सकाळी लवकर उठलो तर लवकर निघता येईल आणि मग रिक्षा, बस किंवा चालत स्टेशनपर्यंत जाण्याचा पर्याय निवडता येईल. खर्च लिहिण्याची ही सवय खूप फायदेशीर आहे. पुढे मोठ्या कंपन्यात काम करताना व्हाऊचर वगैरे भरताना त्याचा उपयोग होईल. मी खर्च लिहीण्यासाठी डायरी वगैरे न वापरता एक कागद वापरतो आणि तो लगेच फाडून टाकतो. कारण हा कागद घरच्यांच्या, विशेषतः वडिलांच्या नजरेस पडला तर खर्च लिहिण्याची ही वाईट सवय आपल्याला का लागली याचा विचार करावा लागेल.
भाषा मधूर आणि दुसर्याला आदर देणारी असायला हवी. शिक्षण कधीच संपत नाही आणि ते संपू नये. भावी काळ स्किल्ड लेबरचा असणार आहे. कोणतीच कला अंगात नसेल, कोणतेही व्यावसायिक शिक्षण नसेल, एखाद्या विषयात तज्ञ बनता आले नाही तर कॉम्पिटीशनमध्ये टिकणं कठीण होईल. म्हणून लहान / मोठी प्रत्येक गोष्ट समोर येईल त्या मार्गाने शिकता आली पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा आणि म्हणूनच महत्त्वाचा सल्ला म्हणजे दिवसभराचा खर्च रोजच्या रोज एका कागदावर लिहा.
भाषेची मधुरता, न संपणारं शिक्षण, तंत्रज्ञानात आघाडी आणि खर्चावर नियंत्रण ही आपली भविष्यातील चतु:सुत्री असली पाहिजे.
०३ जून, २०१३
बुद्धिवर ज्ञानाचा अंकुश!
मनोगतावर स्त्रियांच्या संशयी स्वभावावर एकाने (स्वानुभवावर आधारित?) लेख लिहिला आहे.
हिडिंबा आणि मेनका !
यात लेखकाच्या बायकोने भीम आणि विश्वामित्रचे उदाहरण देऊन लेखकाला कोणत्याही वयाच्या स्त्रीपासून लांब ठेवलेले दिसते. त्यांनी दिलेले दाखले अगदी बिनतोड आहेत आणि त्यांचा महाभारत व पुराणांचा अभ्यासही गाढा दिसतो. पण लेखकाने त्यांना उत्तर म्हणून लक्ष्मणाचे उदाहरण का दिले नाही? इतिहासात हिडिंबा आणि मेनका आहे तशीच सीताही आहे की!
विषयांतर होईल म्हणून तिथे प्रतिसाद न देता इथे माझे मत लिहितो. रामायणातील एक सुंदर प्रश्नोत्तर हे या संशय पिशाच्चावरचा उतारा आहे. लक्ष्मणाला विचारण्यात येते...
अग्निकुण्डसमा नारी घृतकुण्डसमः पुमान| पार्श्वे स्थिता सुन्दरी चेत् कस्य नोच्चलते मनः॥
अग्नि जवळ आला की तूप वितळते तशी अग्निकुंडासारखी सुंदरी समोर असताना कुणाचे मन विचलित होत नाही?
त्यावर दिलेले लक्ष्मणाचे उत्तर पाहा:
मनो धावति सर्वत्र मदोन्मत्तगजेन्द्रवत्| ज्ञानांकुशसमा बुद्धिस्तस्य नोच्चलते मनः॥
मन मदोन्मत्त हत्तीसारखे धावते पण ज्याच्या बुद्धिवर ज्ञानाचा अंकुश आहे त्याचे मन विचलित होत नाही.
तात्पर्य: सगळ्याच स्त्रिया "तशा" नसतात. सगळेच पुरूष "तसे" नसतात. स्त्री पुरुषांच्या नात्यात वैषयिक नात्यापलिकडे खूप काही असते जे दोन भिन्नलिंगांच्या सहजीवनाला उपयुक्त असते. काही वेळा स्त्रियांच्या नजरेने एखाद्या विषयाकडे पाहता येते त्यामुळे आधी न दिसलेले कंगोरे दिसू लागतात. "कायम संशय" हा वैवाहिकच नव्हे तर कोणत्याही नात्यात धोकादायक ठरू शकतो!

२८ डिसेंबर, २०१२
युनिकोडमधील बग
मुळाक्षराचा पाय मोडता येतो. पण त्याला स्वर लागल्यानंतर त्याचा पाय मोडता येत नाही. पण युनिकोडमानकात असे करता येते असे दिसते. उदा...
खाली पाय मोडका "र" दिला आहे तो बरोबर आहे.
र्
पण "रा" चा पाय मोडणे देखील शक्य असे असे दिसते.
रा्
अधिकारा्ची यात जो पाय मोडलेला आहे तो अस्थानी आहे. हा युनिकोडमधील दोष (बग) असावा.
खाली पाय मोडका "र" दिला आहे तो बरोबर आहे.
र्
पण "रा" चा पाय मोडणे देखील शक्य असे असे दिसते.
रा्
अधिकारा्ची यात जो पाय मोडलेला आहे तो अस्थानी आहे. हा युनिकोडमधील दोष (बग) असावा.
२५ डिसेंबर, २०१२
मुक्त स्रोत थिसॉरस
ओपन ऑफिस / लिबर ऑफिसमध्ये थिसॉरस वापरून शब्दांचे अर्थ पाहू शकतो तसेच समानार्थी किंवा विरुद्ध अर्थी शब्द मिळवू शकतो.
बहुधा हाच शब्दसंग्रह वापरून समानार्थी शब्द एका राईट क्लिकवर आणलेले दिसतात.
मराठीमध्ये हे शक्य आहे का? माझ्या माहितीप्रमाणे अशी सुविधा बनवायला बराच वेळ / श्रम लागत असल्यामुळे अजून तरी असा प्रयत्न झालेला नसावा. मोफत आणि मुक्त स्रोत लायसन्सखाली वितरित करता येऊ शकेल असा थिसॉरस बनणे अत्यंत आवश्यक आहे.

१९ डिसेंबर, २०१२
स्पेल चेक डिक्शनरीला आपले योगदान
फायरफॉक्स व ओपन ऑफिस दोन्ही मध्ये राईट क्लिक वापरून शब्द डिक्शनरी वाढविण्याची सोय आहे. अशा प्रकारे इतरांनी जमा केलेले शब्द जर मला मिळाले तर मी ते थेट डिक्शनरीत टाकून ही डिक्शनरी अधिक परिणामकारक व सर्वसमावेशक बनवू शकतो. त्यासाठी मला एक फाईल पाठवून द्या.
फायरफॉक्स:
आपण जर फायरफॉक्स वापरत असाल व राईट क्लिक वापरून बरेच शब्द साठवून ठेवले असतील. तर त्या शब्दांचा बॅकअप घ्या व ती फाईल मलाही पाठवा. त्यासाठी Help मेन्यु मधून Troubleshooting Information निवडा आणि मग "Profile folder - Open Folder" बटनावर क्लिक करा.

आता जो फोल्डर उघडेल त्यातील "persdict.dat" या फाईलला कुठेतरी म्हणजे "माय डॉक्युमेंट" वा तशाच एखाद्या ठिकाणी सेव्ह करा व ती फाईल मला इ-मेल करा.
_____
ओपन ऑफिस, लिबर ऑफिसः
यातही आपण राईट क्लिक करून मराठी शब्द साठवलेले असतील. तर मग रायटरच्या Tools - Options - LibreOffice - Paths मध्ये जाऊन अॅटो करेक्टचा पाथ पाहून ठेवा.
किंवा start – run च्या डायलॉगबॉक्स मध्ये %APPDATA% असे टाईप करा व "ओके" द्या. आता आपण थेट अॅप्लिकेशन डाटा या फोल्डरमध्ये पोहोचू.
इथून पुढे \LibreOffice\4\user\wordbook अशा पायर्या पार केल्या की standard.txt फाईल दिसेल हीच फाईल मला पाठवा व तिचा बॅक-अप देखील घ्या.
थोडक्यात ओपन ऑफिस वापरत असाल तर standard.dic आणि फायरफॉक्स वापरत असाल तर persdict.dat या फाईलचा बॅकअप घेऊन ठेवा आणि ती फाईल मला पाठवा, या पत्त्यावर shantanu.oak@gmail.com
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

ploy|2
(noun)|gambit|remark (generic term)|comment (generic term)
(noun)|gambit|stratagem|maneuver (generic term)|manoeuvre (generic term)|tactical maneuver (generic term)|tactical manoeuvre (generic term)
ploy|12626348