firefox लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
firefox लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

०२ ऑगस्ट, २०२३

Persian Spell check firefox add-on

The first version of Persian spell check was developed by Bahram Maravandi on 25 June 2018. It was later updated on 3 April 2019 and again on 20 November 2019.

First version - 2018-06-25 - Persian Dictionary by Bahram Maravandi (12,828 users)

Second version - 2019-04-03 - Lilak by man194 (85 users)

Third version - 2019-11-20 - Lilak, Persian Spell Checker Dictionary by Mostafa Sedaghat Joo (410 users)

The second version used the same affix file but updated the tags in dic file.
Third version made minor changes to affix file, updated the tags and also removed / added a few hundred words.

So the third version seems to be the most accurate one. There seems to be no libre-office version available.

१० जानेवारी, २०२१

हंस्पेलमधील रीप्लेसमेंट टॅग

 चुकीच्या शब्दांना योग्य शब्द सुचवताना जे पर्याय येतात ते काही वेळा समर्पक नसतात. "वालवतो" या शब्दाला “वाळवतो” अशी सुचवणी न येता “चालवतो, घालवतो, खालवतो, खालावतो" हे शब्द सुचवले जात आहेत. याचे कारण हंस्पेलने "वालवतो" या शब्दातील "वा” चुकीचा असण्याची शक्यता गृहीत धरली आहे. आता आपण दुसरा शब्द पाहू. "वाडवतात” या शब्दाला “वागवतात वाजवतात वाळवतात वाचवतात" अशी सुचवणी  येत आहे. याचा अर्थ इथे "वा” नव्हे तर "ड” बदलायला हवाय हे हंस्पेलला बरोबर कळले. पण "ड” ला "ढ” हा "ग” अथवा "ज” पेक्षा जास्त जवळचा पर्याय आहे हे त्याला माहीत नाही. त्यामुळे "वाढवतात” हा पर्याय दिसत नाही. लोकं "ढ” च्या ऐवजी "ड” टाईप करतात कारण फोनेटिक मध्ये  "ढ” काढणे हे "ड” पेक्षा जास्त त्रासदायक ठरते. कोणते अक्षर कोणत्या अक्षराला जास्त जवळचे आहे हे हंस्पेलला शिकवण्यासाठी "रीप्लेसमेंट टेबल” चा टॅग वापरता येतो.

REP 9
REP स श
REP स ष
REP श ष
REP प फ
REP ज झ
REP ल ळ
REP न ण
REP त ट
REP ड ढ

"विसरला" हा शब्द "विषरला" असा सहसा लिहला जात नाही. कारण बहुतेक इन्पुट मेथडमध्ये ष हे अक्षर काढण्यासाठी ३ की-स्ट्रोक वापरावे लागतात. पण "विषय" हा शब्द "विशय" असा सर्रास लिहला जातो. त्यामुळे वर दिलेल्या  रीप्लेसमेंट टेबलमध्ये श – ष अशी नोंद असली तरी ष – श अशी नोंद नाही. यात कोणाला काही बदल करायचा असेल तर विकीच्या ह्या पानावर चुकीचा शब्द – बरोबर शब्द – सध्या दिसणारे पर्याय अशी नोंद करावी.  

https://tinyurl.com/replacement-table

रीप्लेसमेंट टेबल हा टॅग वापरून आपण आपला स्पेल चेक अधिक परिणामकारक बनवू शकू.

१९ डिसेंबर, २०१२

स्पेल चेक डिक्शनरीला आपले योगदान

फायरफॉक्स व ओपन ऑफिस दोन्ही मध्ये राईट क्लिक वापरून शब्द डिक्शनरी वाढविण्याची सोय आहे. अशा प्रकारे इतरांनी जमा केलेले शब्द जर मला मिळाले तर मी ते थेट डिक्शनरीत टाकून ही डिक्शनरी अधिक परिणामकारक व सर्वसमावेशक बनवू शकतो. त्यासाठी मला एक फाईल पाठवून द्या.

फायरफॉक्स:
आपण जर फायरफॉक्स वापरत असाल व राईट क्लिक वापरून बरेच शब्द साठवून ठेवले असतील. तर त्या शब्दांचा बॅकअप घ्या व ती फाईल मलाही पाठवा. त्यासाठी Help मेन्यु मधून Troubleshooting Information निवडा आणि मग "Profile folder - Open Folder" बटनावर क्लिक करा.


आता जो फोल्डर उघडेल त्यातील "persdict.dat" या फाईलला कुठेतरी म्हणजे "माय डॉक्युमेंट" वा तशाच एखाद्या ठिकाणी सेव्ह करा व ती फाईल मला इ-मेल करा.
_____

ओपन ऑफिस, लिबर ऑफिसः
यातही आपण राईट क्लिक करून मराठी शब्द साठवलेले असतील. तर मग रायटरच्या Tools - Options - LibreOffice - Paths मध्ये जाऊन अ‍ॅटो करेक्टचा पाथ पाहून ठेवा.


 किंवा start – run च्या डायलॉगबॉक्स मध्ये %APPDATA% असे टाईप करा व "ओके" द्या. आता आपण थेट अ‍ॅप्लिकेशन डाटा या फोल्डरमध्ये पोहोचू.


इथून पुढे \LibreOffice\4\user\wordbook अशा पायर्‍या पार केल्या की standard.txt फाईल दिसेल हीच फाईल मला पाठवा व तिचा बॅक-अप देखील घ्या.


थोडक्यात ओपन ऑफिस वापरत असाल तर standard.dic आणि फायरफॉक्स वापरत असाल तर persdict.dat या फाईलचा बॅकअप घेऊन ठेवा आणि ती फाईल मला पाठवा, या पत्त्यावर shantanu.oak@gmail.com

२५ मार्च, २०११

मराठी हिंदीतील फरक

https://addons.mozilla.org/af/firefox/addon/hindi-spell-checker/

हिंदी भाषेसाठी बनलेला फायरफॉक्स स्पेलचेकर नुकताच माझ्या पाहण्यात आला. मी तो अर्थात लगेच वापरून पाहिला. त्यात मराठी / हिंदी भाषेतील एक मुलभूत फरक माझ्या लक्षात आला. टेक्निकल अंगाने व भाषाशास्त्राच्या दृष्टीनेही त्यात काही तथ्य असावे.
मराठी मध्ये जसे स, ला, ते, चा, ची, चे असे प्रत्यय लागतात तसे हिंदी भाषेत लागत नाहीत. त्यामुळे त्या भाषेतील स्पेलचेकरमध्ये केवळ पंधरा हजार शब्द असून तो स्पेल चेकर चांगला चालतो आहे. उदा..

भाषा की - भाषेची
भाषा का - भाषेचा
भाषा के - भाषेचे

मराठीत असे एका शब्दापासून अनेक शब्द बनतात तसे "तिकडे" बनत नाहीत. इकडे प्रत्येक शब्द स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखतो, पण हिंदी / इंग्रजीत असे होत नाही बहुतेक!

for language
to language

यात लैंग्वेज हा शब्द बदलत नाही. तर फॉर, टू असे प्रत्यय बदलतात. यामुळे त्या दोन भाषा जवळच्या वाटतात तशी मराठीला इंग्रजी तांत्रिक द्रष्ट्या जवळची वाटत नाही.

२२ ऑक्टोबर, २००८

मराठी फायरफॊक्स

पुढील दुव्यावरील पानावर फायरफॊक्सची मराठी आवृत्ती डाउनलोड करण्याकरिता नुकतीच उपलब्ध झाली आहे.
http://www.mozilla.com/en-US/firefox/all.html#beta_versions

वरील आवृत्ती बिटा प्रकारची असल्याकारणाने भाषांतरात चुका असतील. मी लगेच वापरायला सुरवात केली आणि अजून तरी पुन्हा इंग्रजी भाषेतील पर्याय पाहिलेच पाहिजेत अशी वेळ आलेली नाही. कदाचित फायरफॉक्सचे मेन्यू पाठ असल्याचा परिणाम असावा. पण खाली दिलेली वाक्ये सुधारता येतील असे नक्कीच वाटून गेले.

नेटवर्क कालबाह्य
www.bloglines.com येथील सर्वर प्रतिसाद देण्यास जास्त वेळ घेत आहे.
विनंती केलेल्या स्थळाने जोडणीकरता विनंतीस प्रतिसाद दिला नाही व ब्राउजर त्याकारणास्तव प्रतिउत्तर देण्यास अकार्यक्षम झाला आहे.
* सर्वर अति गरजा किंवा तात्पुरते गरजा अनुभवत आहे ?पुन्हा प्रयत्न करा.
* इतर स्थळे ब्राउज करतेवेळी समस्या? संगणकाची नेटवर्क जोडणी तपासून पहा.
* काय आपले संगणक नेटवर्क फायरवॉल किंवा प्रॉक्सी संरक्षित आहे? चुकीची संरचना वेब ब्राउजींग मध्ये व्यत्यय आणण्यास कारणीभूत ठरवू शकते.
* तरी समस्याचे उत्तर नाही? नेटवर्क व्यवस्थापकाचे किंवा इनटरनेट प्रबंधकाशी मदतीकरता विचारविनिमय करा.
"पुन्ही प्रयत्न करा"

(यातील "पुन्ही प्रयत्न करा" मधील "पुन्ही" ही चूक मात्र अक्षम्य.) चित्र पहा ...
http://www.flickr.com/photos/shantanuo/2914284800

मराठी फायरफॉक्स मध्ये मराठीत लिहिण्याची कोणतीच सोय नाही. तेव्हा "इंडीक इनपुट एक्स्टिंशन" व "लिप्यंतरासाठी गिरगिट" या सुविधांसकट उपलब्ध करता येईल का?
http://www.manogat.com/node/14072

भविष्यात "मुक्त शुद्धलेखन चिकित्सा" देखील समाविष्ट होऊ शकली तर सोन्याहून पिवळे!!
http://mr.upakram.org/node/114