एका डॉक्टरनेच हा प्रश्न विचारला आहे की, गर्भ नाकारण्याचा स्त्रीचा हक्क जसा समाजाने मान्य केला आहे, तसा (टेक्नोलॉजी वापरून) गर्भवती होण्याचा हक्क मान्य केला जाणार आहे की नाही?
http://doctorandpatient.blogspot.com/2010/08/why-are-young-fertile-women-doing-ivf.html
याचे उत्तर देणे फार कठीण आहे. मागे असाच एक मुद्दा पेपरात वाचला होता. त्याचेही उत्तर मी अजून शोधतो आहे. तंत्रज्ञान जस जसे प्रगत होत आहे तसे नैतिक - अनैतिकतेच्या कल्पनाही बदलतील, बदलाव्या लागतील बहुतेक!
प्रश्न असा आहे की, इंदिरा गांधी वा किरण बेदी न होताही सर्वसामान्य मुलगी म्हणून जन्माला येण्याचा आणि जगण्याचा मुलीला अधिकार आहे की नाही? कुणासाठीही उपयुक्त न ठरता केवळ जगण्याचा (मुक्या जनावराला) हक्क आहे की नाही?
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5928677.cms
१३ ऑगस्ट, २०१०
१२ जून, २०१०
दमलेल्या बाबाची दुसरी बाजू
दमलेला बाबा सगळ्यांना मनसोक्त रडवतोय. युट्युबवर पाहा.
http://www.youtube.com/watch?v=4Q4XggDMETI
सहसा माझ्या डोळ्यात कधी पाणी येत नाही. पण हा व्हिडीओ पाहाताना आले.
डोळे पुसल्यावर थोडा मेंदू हलवला आणि दमलेल्या बाबाची दुसरी बाजू समोर आली. बाबाला २-३ वर्षांची छोटी मुलगी आहे म्हणजे वय तिशीच्या आसपास असणार. या वयात हार्ट ट्रबल, पाठदुखी, कंबरदुखी अशा छोट्या मोठ्या आजारांनी बाबा सतत का त्रस्त असतो? कॉलेजमध्ये असताना गंमत म्हणून लागलेली सिगरेटची सवय अजुनही चालूच? कधीतरी पार्टीत 'घ्यावीच लागते' म्हणून सुरू झालेली ड्रिंक्स आता कधी-मधी घरात कोणी नसताना चोरून पिताना बाबाला आठवते का आपली चिमुरडी? डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे व्यायाम होतो का कधी? तेरड्याचा रंग तीन दिवस? निदान योगातरी करायला हवा असे कधीतरी एकदा म्हटले की योगा 'होत' नाही. तो 'करावा' लागतो! थोडा पगार जास्त मिळतो म्हणून नोकरी बदलली, आता नवीन नोकरीत स्थिरस्थावर होण्यासाठी जास्त काम. बायको, मुलं कमी पैशात, कमी खर्चात राहायला तयार असताना लोन काढून ब्लॉक घेताना बाबाने नक्की काय हिशोब केला होता त्याचे त्याला माहीत. आई वडिलांशी पडत नसेल तर सरळ वेगळे होईन असा तोरा दाखवायचा तर घ्यावीच लागते जागा लांब, शहराबाहेर. मग लोकलचा प्रवास घाम गाळत करावा लागला तर त्याला बाबाच कारणीभूत आहे.
बाबा दमलाय हे खरे, पण त्याला जबाबदार कोण?

२५ मे, २०१०
असेही असते तर...
अनेक वेळा चावून चोथा झालेले विषय वारंवार चर्चेत आणून त्याचा आधार घेत सुतावरून स्वर्गात जाण्याचा प्रयत्न इंटर्नेटवर पडीक असलेली मंडळी करीत असतात. यातून काहीवेळा जातीय विखारही फुत्कारून घेतला जातो. उदाहरण द्यायचे तर या चर्चेचे देता येईल.
http://mr.upakram.org/node/2510
"वाल्मीकी रामायणातील स्त्रीजीवन" या विषयाशी फोटोसहित "सिक्स पॅक्स विश्वामित्र" आणि "एट(की टेन) पॅक्ड् भगवान परशुरामाचे पक्के युरोपियन वाटणारे कल्पनाचित्र" कसे काय संबंधित असू शकते? याचा अर्थ एकच आपला प्रतिसाद या विषयाशी संबंधित असो वा नसो आपल्या अन्ननलिकेत सतत घोळणारे गरळ कुठेतरी ओकून टाकले की माणसाला थोडे बरे वाटते. अर्थात इंटरनेटचा वापर अशा कारणांसाठीदेखील मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्याला काही हरकत असू नये.
माझाही खालील प्रतिसाद विषयाशी संबंधित नाही, तर एका प्रतिसादाशी संबंधित आहे - म्हणून मी ब्लॉगवर लिहित आहे.
_____
सहज शक्य असणार्या अनेक गोष्टी रामाने केलेल्या नाहीत ही गोष्ट लक्षात घेतली की रामाचे वेगळेपण जाणवायला हरकत नाही.
राज्यावर येण्यासाठी बापाचा, भावाचा काटा काढणार्या कथांनी जागतिक इतिहासाची पानेच्या पाने भरून गेलेली असताना सहज शक्य असताना राज्याभिषेकापासून दूर जाणारा राम मला तरी अपवादात्मकच वाटतो.
रावणाचे अंत्यसंस्कार करण्यास बिभिषणाने नकार दिला, तेंव्हा मेल्यावर वैर संपते असा विचार देणारा राम तेंव्हाच्याच नव्हे तर नंतर आलेल्या अनेक राजांपेक्षा वेगळा ठरतो.
मरणान्तानि वैराणि निवृतं नः प्रयोजनम् । कीयतामस्य संस्कारो ममापेष्य यथा तव ॥
लंकेतून परत येताना फक्त सीता आणि एअर लंकेचे एक फ्लाईट इतकेच रामाने आपल्याबरोबर आणले. त्यावेळचे त्याचे उद्गार निदान संस्कृत साहित्यात तरी अमर झाले आहेत.
अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥
राम-सीतेबरोबर इतकी वर्षे वनात राहूनही मी केयूरे, कुंडले ओळखत नाही पण सीतेची पैंजण मात्र ओळखतो असे म्हणणारा लक्ष्मण तर काही वेळा रामापेक्षा मोठा वाटतो.
नाहं जानामि केयुरे नाहं जानामि कुण्डले । नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवन्दनात् ॥
केवळ रामाचेच नव्हे तर लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या सर्व भावंडांचे व त्यांच्या अर्धांगिनींचे चारित्र्य सोळा आणे शुद्ध होते असे बहुतेक ऐतिहासिक संसाधने सांगतात. 'तसला' आरोप रामावर कोणी केल्याचे माझ्यातरी वाचनात नाही. प्रस्थापित विचारांना उडवून लावण्याच्या सध्याच्या फैशनचा हा भाग असे असे समजून या आरोपाकडे दुर्लक्ष करणेच चांगले असे माझे वैयक्तिक मत आहे.

११ मे, २०१०
मराठीचा ट्रॅप
दादर सार्वजनिक वाचनालय येथे संपन्न झालेल्या "मराठी ब्लॉगर्स" संमेलनामुळे मला झालेला फायदा म्हणजे इन्स्क्रिप्ट टंकलेखनाचे महत्त्व (नव्याने) समजले. लीना मेहेंदळे यांनी इंग्रजीतून विचार करण्यास भाग पाडणारे फोनेटिक तंत्र विसरा व इन्स्क्रिप्ट पद्धतीने टंकलेखन करा नाहीतर अजून काही वर्षांनी मराठी देवनागरीत का लिहावी? सरळ रोमनागरीतच का लिहू नये असा विचार पुढे येईल आणि तो मान्य झाला तर देवनागरी लिपीच (मराठीपुरती) नष्ट होईल असा इशारा दिला. हा विचार मला थोडा अतिरंजित वाटला. असे होण्याची शक्यता फार कमी आहे. ताईंनी "ट्रॅप" हा शब्द वापरला. मी माझी ओळख करून देताना तोच धागा पुढे नेऊन असे सांगितले की देवनागरी लिपी नष्ट करण्याचा खरा ट्रॅप अशुद्धलेखन व त्याचे निर्लज्ज समर्थन हे आहे. उदाहरण द्यायचे झाले तर "पितळी तांब्या" हा शब्द आपण जर "पितळि पीतळी पीतळि पितली पितलि पीतली पीतलि पित्ळी" अशा विविध प्रकारांनी लिहू लागलो तर अजून काही वर्षांनी रोमन मध्ये लिहिलेले "pitalee tambya" डोळ्यांना अधिक सुखावह वाटू लागेल. त्यात र्ह्स्व दीर्घ, जोडाक्षरांची "भानगड" नाही आणि जगात कोणालाही वाचता येईल, भाषा नाही समजली तरी!
विनोबांनी एके ठिकाणी म्हटले आहे की "विस्मरण हा दोष आहे असे कोणाला वाटतच नाही." त्याप्रमाणे अशुद्धलेखन हा एक दोष आहे असे हल्ली कोणाला वाटतच नाही की काय असा प्रश्न मला काही वेळा पडतो. "त्यांच्या"त असेच लिहितात ते मान्य करा नाहीतर मार खाल असे काही बाष्कळ समर्थन कोणी करेल असे वाटत नाही. कवितेत, लिखाणात पात्रांच्या तोंडी जी बोली भाषा यावी लागते ती तशी लिहिण्यास शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे सूट आहेच. आक्षेप आहे तो भाषा आणि लिपी गांभीर्याने न घेण्यावर. ताई आणि दादांनो, माझ्यामते हा ट्रॅप जास्त धोकादायक आहे!!

१६ जानेवारी, २०१०
निवान्त की निवांत?
निवान्त हा शब्द बरोबर आहे की निवांत?
आपल्या (निदान माझ्या तरी) डोळ्याला निवांत वाचण्याची सवय झाली आहे. भाषाशास्त्राच्या दृष्टीने कदाचित निवान्त देखील बरोबर असेल. पण गुगल सर्च दोन्ही साठी वेगवेगळे रिझल्ट दाखवत आहे. (निवांत २८५०० - निवान्त - ४०० ) याचा अर्थ संगणकशास्त्राला हे दोन शब्द एकच आहेत हे माहीत नसावे असे वाटते. त्यामुळे "हा शब्द असाही लिहिता येतो" या सवलतीचा मला आता त्रास होऊ लागला आहे. संगणकशास्त्राने या बाबतीत भाषाशास्त्रापेक्षा वेगळी नियमावली अंगिकारावी असे वाटते. तसेही संगणक सॉर्टिंग ऑर्डरच्या बाबतीत भाषाशास्त्राचे नियम पाळत नाहीच. तेंव्हा मग या बाबतीतही "एक शब्द एक पद्धत" या न्यायाचा अवलंब करावा. दोन्ही शास्त्रांत समन्वय झाला असता तर उत्तम होते पण तसे होईल असे वाटत नाही.

२७ डिसेंबर, २००९
रवी रतलामी यांना मंथन पुरस्कार
छत्तीसगडी या भाषेत संपूर्ण संगणक उपलब्ध करून देण्याचं भगिरथ काम ज्यांनी केले त्या रवी रतलामी यांना यंदाचा मंथन पुरस्कार मिळाला हे लोकलायझेशनच्या क्षेत्रात काम करणार्यांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. सुमारे एक लाख स्ट्रींग्स इंग्रजीतून छत्तीसगडी या भाषेत भाषांतरित कराव्या लागल्या तेंव्हा कुठे या प्रयोगाने थोडाफार आकार घेतला. त्यांचं मूळ नाव रवीशंकर श्रीवास्तव. पण जालावर सर्वजण आपल्या ब्लॉगच्याच नावाने ओळखले जातात. ते जेव्हा रवी रतलामी या नावाने हिंदी ब्लॉग लिहीत तेव्हापासून मी त्यांचा ब्लॉग वाचत आलो आहे. पुण्यातील एका कार्यशाळेत त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचाही योग आला होता. एका निरलस, निरपेक्षपणे काम करणार्याला एक मोठा पुरस्कार मिळाला ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आता इथेच थांबतो कारण मराठीच्या के.डी.ई ची प्रगती किती असा साळसूद प्रश्न करून माझ्या चेहर्यावरचे भाव निरखण्याचा एक प्रकारचा आसूरी आनंद मी कोणालाच मिळू देणार नाही.
२६ डिसेंबर, २००९
एका जंगलाची गोष्ट
खूप पुर्वीची गोष्ट नाही. असेल काही वर्षांपूर्वीचीच. पण वाटते कित्येक युगे लोटली असतील त्याला. तर मी काय म्हणत होतो, पूर्वी एक होते जंगल. आता तुम्ही म्हणाल त्यात काय इतके, पूर्वी होतीच जंगलं खूप. आता माणसाची भूकच इतकी वाढली आहे की जंगलांना जागाच उरलेली नाही वाढायला. एका जंगलाला लागून दुसरे असे वाढत होते, आपल्याच हिशोबाने. जंगलांना काही डेडलाईन नसते की क्लाएंटची भिती. वाढायला लागली काही वर्ष तर कोणाला काय पडलीय त्याची?
तर त्या जंगलाकडे एका कुशल माळ्याचे लक्ष गेले. त्याच्या मनात फार पूर्वीपासून एक सुंदर बगिचा बनवायचे फार होते. त्याने काही विचार केला आणि कामाला लागला. प्रथम त्याने आडवीतिड्वी वाढलेली झाडे छाटून टाकली. सुंदर पायवाटा तयार केल्या. चहू बाजूंनी तटबंदी उभारली. एकच प्रवेशद्वार ठेवले येणार्या जाणार्यांवर लक्ष ठेवायला. आत आल्यावर कोणाच्याही तोंडून उद्गार निघाले पाहिजेत की वा!!
प्रवेशद्वाराशीच एक नोंदवही ठेवली. त्यात येणार्या जाणार्यांचे शेरे असत. परदेशात राहिलेल्या काही विदुषी इतक्या खूष झाल्या की म्हणाल्या "अगदी इडन गार्डनची आठवण झाली हो!" माळ्याच्या अंगावर मुठभर मास चढले.
जंगली पशू, पक्ष्यांना जंगल आणि गार्डन यातला फरक लगेच कळतो. त्यांनी हे गार्डन केव्हाच सोडले होते. जे राहिले ते रिंगमास्तरकडे बघून दिवस काढू लागले. हे जंगल होते, आहे आणि राहू द्या असे म्हणणार्यांच्या बाबतीत माळीकाका "हे दयाळू ईश्वरा या निर्बुद्धांना क्षमा कर ते काय बोलत आहेत ते त्यांचे त्यांना समजत नाही." अशी प्रार्थना करीत. त्यांच्या मनात कोणाबद्दलही काही आकस नव्हताच.
जंगलांचे नियम वेगळे असतात. त्यात एक जीव प्रसंगी दुसर्याला खाऊन जगतो. झाडांना बंधन नसते कसे वाढायचे. गायी गुरांच्या जाण्या येण्याच्या वाटेला पायवाट म्हणायचे झाले. तेथे निसर्ग हाच माळी असतो. तज्ज्ञ माळ्याची गरज असते ती बागेला. माणसाला बाग आणि जंगल दोन्ही हवे असते, आहे. हे जंगल असेच राहू द्या. उन्हाने, दुष्काळाने वाळले तरी बिया असतातच कुठेतरी पडलेल्या. त्या उमलतील पुढच्या काळात. पुढच्या पिढ्यांना कधीच न चाखलेली फळ खायला मिळतील करवंदासारखी. कारण त्यांची पैदास बागेत थो़डीच होते?
या लेखात वर्णन केलेल्या बागेचे मराठी विकिपीडियाशी जर साम्य दिसले तर तो एक निव्वळ योगायोग समजावा.

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)