निवान्त हा शब्द बरोबर आहे की निवांत?
आपल्या (निदान माझ्या तरी) डोळ्याला निवांत वाचण्याची सवय झाली आहे. भाषाशास्त्राच्या दृष्टीने कदाचित निवान्त देखील बरोबर असेल. पण गुगल सर्च दोन्ही साठी वेगवेगळे रिझल्ट दाखवत आहे. (निवांत २८५०० - निवान्त - ४०० ) याचा अर्थ संगणकशास्त्राला हे दोन शब्द एकच आहेत हे माहीत नसावे असे वाटते. त्यामुळे "हा शब्द असाही लिहिता येतो" या सवलतीचा मला आता त्रास होऊ लागला आहे. संगणकशास्त्राने या बाबतीत भाषाशास्त्रापेक्षा वेगळी नियमावली अंगिकारावी असे वाटते. तसेही संगणक सॉर्टिंग ऑर्डरच्या बाबतीत भाषाशास्त्राचे नियम पाळत नाहीच. तेंव्हा मग या बाबतीतही "एक शब्द एक पद्धत" या न्यायाचा अवलंब करावा. दोन्ही शास्त्रांत समन्वय झाला असता तर उत्तम होते पण तसे होईल असे वाटत नाही.