अनुस्वार द्यावा की देऊ नये?
याचा निर्णय शुद्धलेखन नियमात सुरवातीलाच दिलेला आहे. (नियम १.१ व नियम १.५)
फक्त स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. ज्या शब्दांमधील अनुस्वारांचा उच्चार अस्पष्ट असतो. किंवा तो उच्चारलादेखील जात नाही. अशा शब्दांवर अनुस्वार देऊ नये. जुन्या साहित्यात अनुस्वाराचा विपुल उपयोग केलेला आढळेल. आताच्या जमान्यात असे नाकात बोलले जात नाही, तसेच लिहिलेही जात नाही.
उदाहरणार्थ:
अनुस्वार द्यावाः गुलकंद, चिंच, तंटा, आंबा
अनुस्वार देऊ नयेः हंसणे, धांवणे, जेव्हां, कोठें, कधीं, कांही
पर-सवर्ण पद्धतीने अनुस्वार दिलेला चालेल का?
याचा निर्णय देखील नियमात सुरवातीलाच दिलेला आहे. (नियम १.२ व नियम १.३) पण या नियमाचा अर्थ नीट न लावला गेल्यामुळे फार गोंधळ निर्माण झाला आहे. तर नियम असे सांगतो की -
तत्सम म्हणजे संस्कृतमधून मराठीत आलेल्या शब्दांना पर-सवर्ण पद्धतीचा अनुस्वार द्यायला "विकल्पाने” हरकत नाही.
यात तीन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
१) ही सूट संस्कृतमधून मराठीत आलेल्या शब्दांनाच आहे. प्युअर मराठी शब्द जसे संप, आंबा, मंदिर, दंगा हे अनुस्वारानेच लिहायचे आहेत. आई आपल्या मुलाला जसे रंग, रूप देते तसेच कधी कधी ब्लड प्रेशर, डायबिटीस देखील देते तसे पर-सवर्ण ही संस्कृतची "लिगसी” मराठी भाषेला मिळाली आहे. ती सांभाळण्याचे टेंशन घेऊ नका. आधीच जोडाक्षरे लिहताना आमची हालत होते. त्यात अनुस्वाराने भागणारे काम जोडाक्षराने का लिहायचे? कोणता शब्द संस्कृतातून आला आहे आणि कोणता ९६ कुळी मराठी आहे याची कल्पना आमच्या तीर्थरूपांना देखील नाही, तर आम्हाला कुठून असणार? नियमानुसार 'अंतर्गत' शब्द 'अन्तर्गत' असा लिहिला तर चालेल. पण 'संबंधित' शब्द 'सम्बन्धित' असा लिहता येणार नाही. कारण काय तर 'अंतर्गत' संस्कृत तर 'संबंधित' मराठी शब्द आहे. काय सांगता? हे कसे ओळखले बुवा? बुरखा घातलेल्या बाईचे वय, सौंदर्य काही जाणकार सांगू शकतात. पण आम्ही कशातलेच जाणकार नसल्यामुळे बाई किंवा शब्द ओळखू शकत नाही. आता तो आमचाच प्रॉब्लेम आहे हे मान्य. पण त्यासाठी तत्सम व तद्भव शब्दांचे वेगवेगळे शब्दकोश तरी उपलब्ध आहेत का? तर उत्तर नाही. किंवा कोणत्या शब्दकोशात तशी काही खूण आहे का? १०० / २०० वर्षांपूर्वीच्या एखाद्या शब्दकोशात तशी सोय असेल कदाचित पण तो शब्दकोश आता "आऊट ऑफ प्रिंट" झाल्यामुळे बघायला देखील मिळणार नाही!
२) दुसरी गोष्ट म्हणजे "हरकत नाही” या शब्दाने काय सूचित होते? त्याचा अर्थ अनुस्वार देणेच अपेक्षित आहे पण एखाद्या डुढ्ढाचार्याने पर-सवर्णाचे सोवळे पाळले तर आम्ही "हरकत” घेणार नाही.
३) तिसरी गोष्टः
विकल्पाने पर-सवर्ण लिहिण्यास हरकत नाही. यातील विकल्पाने याचा अर्थ काय? विकल्प या शब्दाचा अर्थ इथे "एकापेक्षां अधिक रूपांचा किंवा नियमांचा स्वीकार" हा आहे. पण त्याबरोबरच विकल्प शब्दाचा मोल्सवर्थने लावलेला अर्थ म्हणजे respecting difference of opinion असा आहे. म्हणजे भिन्नमताचा आदर करा. पण म्हणून मूळ नियमाला म्हणजे अनुस्वाराला विसरून जा असे होत नाही.
नियम असेही सांगतो की अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच पर-सवर्ण म्हणून वापरावे. लोकं सरसकट न किंवा म वापरतात ते चुकीचे आहे. ‘त' वर्गासाठी 'न’ तर प साठी म वापरले पाहिजे. त वर्ग म्हणजे त, थ, द ध न उदाहरणः पंडित=पण्डित, अंतर्गत=अन्तर्गत, अंबुज=अम्बुज.
फांद्यांचा हा शब्द फान्द्यान्चा असा लिहणे अशुद्ध आहे. फार तर तो फान्द्याञ्चा असा लिहता येईल कारण नियमाप्रमाणे द ला न तर च ला ञ जोडावा लागेल. आता तुम्हीच सांगा की तुम्हाला फांद्यांचा वाचायला आवडेल की फान्द्याञ्चा ? मुळात फांदी हा शब्द संस्कृत नसून मराठी आहे त्यामुळे त्याला पर-सवर्ण वापरायची सूटच नाही! आता झाला का वांदा (की वान्दा?) तर मूळ मुद्दा असा आहे की पर-सवर्णाच्या नादात जोडाक्षरे वाढतात, ती बेढब दिसतात. लिहायला अवघड जातात. अनुस्वाराची बिंदी वर लावली की खाली त वर्ग आहे की प वर्ग याची चिंता करावी लागत नाही. तसेच तत्सम की तद्भव याचाही विचार करावा लागत नाही.
पर-सवर्ण नीट विचार करून वापरला नाही तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो.
उदाहरणार्थ:
वेदांत=वेदांमध्ये, वेदान्त= तत्वज्ञान,
देहांत=शरीरांमध्ये, देहान्त= मृत्यू.
या विषयाला एक तांत्रिक बाजू देखील आहे. युनिकोडमध्ये (गूगलमध्ये) तेंडुलकर आणि तेण्डुलकर तसेच तेन्डुलकर वेगवेगळ्या इंडेक्सखाली नोंद होतात. कुणी तेंडुलकर म्हणून शोधले तर पर-सवर्ण पद्धतीने लिहिलेला लेख मिळणार नाही.
खाली दिलेले सर्व शब्द मराठी आहेत. सबब त्यांना अनुस्वाराची बिंदी लावावी. पर-सवर्णाची फॅशन तिकडे हिंदीत करा फार तर, इकडे नको!
सन्त अम्बादास मन्दिर मण्डळ, शेन्दूर पारम्पारिक सौन्दर्यासाठी बान्धल्यानन्तर यशवन्तराव स्वातन्त्र्यसैनिकान्ना

_____
इंग्रजी शब्द लिहिताना देखील अनुस्वारयुक्त शब्द लिहिणेच बरोबर आहे. पर-सवर्ण पद्धतीने लिहू नयेत.
१) "ब्रँडी" = ब ् र ँ ड ी (३ मुळाक्षरे + ३ स्वर) - ७२ हजार रिझल्ट
२) "ब्रॅंडी" = ब ् र ॅ ं ड ी (३ मुळाक्षरे + ४ स्वर) - १६ हजार रिझल्ट
३) "ब्रॅण्डी" = ब ् र ॅ ण ् ड ी (४ मुळाक्षरे + ४ स्वर) - २२२ रिझल्ट
४) "ब्रॅन्डी" = ब ् र ॅ न ् ड ी (४ मुळाक्षरे + ४ स्वर) - ७ हजार रिझल्ट