आतून, करून, नजीक, बदली आणि वतीने ही अव्यये मनोगत साईटने स्वीकारलेली दिसत नाहीत. याचा अर्थ बसण्याबदली, बसण्यावतीने असे शब्द त्यात चुकीचे म्हणून दाखविले जातात. तसेच अनेकवचनी रूपे म्हणजे बसण्यांचा, बसण्यांच्या बसण्यांस ही देखील त्यात नाहीत. पण मनोगतात नाहीत म्हणजे मराठीत नाहीत असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणून यात ठेवली आहेत.
३१ जानेवारी, २०२०
बसलय की बसलंय?
टॅग P मधील हे चार रूल बरोबर आहेत का?
SFX P णे लस णे
SFX P णे लंस णे
SFX P णे लय णे
SFX P णे लंय णे
यापासून बसलस, बसलंस, बसलय, बसलंय किंवा बसवलय, बसवलंय असे शब्द तयार होतात. त्यातील अनुस्वारयुक्त शब्द बरोबर आहेत. अनुस्वार नसलेले म्हणजे बसलय, बसवलय काढायचे तर हे दोन रूल कमी करावे लागतील.
SFX P णे लस णे
SFX P णे लय णे
सध्यातरी अनुस्वार नसलेले आणि असलेले असे चारही रूल्स आहेत. पण भविष्यात बहुतेक हे दोनच रूल्स राहतील.

२९ जानेवारी, २०२०
नाबर की नंबर?
गुगलने मशीन लर्निंगचा वापर करून सर्च रिझल्ट दाखवायला सुरुवात केली, त्याला आता फार नाही पण एक-दोनच महिने झाले असतील.
https://www.blog.google/products/search/search-language-understanding-bert/
काही बाबतीत रिझल्टमध्ये सुधारणा झाली असली तरी इतर बऱ्याच बाबतीत आणि विशेषतः देवनागरी सर्चची क्वालिटी घसरलेली दिसते. आज मी "मंगेश नाबर” या व्यक्तीची माहिती गुगलून पाहिली तर "मंगेश" आणि "नंबर" हे दोन शब्द असलेली पाने पहिल्या पानावर दिसत आहेत. बहुतेक गुगलने "नाबर” या शब्दाला बदलून "नंबर” केले असावे!

१२ जानेवारी, २०२०
स्पर्धापरीक्षेचा खरा धोका
राजन गवस यांचा "सुत्तडगुत्तड : स्पर्धापरीक्षेची लष्करअळी” हा लेख वाचण्यासारखाः
https://www.loksatta.com/chaturang-news/armyworm-of-the-competition-exam-abn-97-2020627/
लेखाचा सारांश असाः
नोकऱ्याच नसतील, असलेल्या वशिल्याशिवाय मिळतच नसतील, तर शिकायचं कशाला, अशी मानसिकता तयार होत असतानाच यूपीएससी, एमपीएससीची लष्करअळी कोणीतरी गावात आणून सोडली. जागा कमी, परीक्षा देणाऱ्यांची संख्या कैक लाखांत. एक परीक्षा, दोन परीक्षा करत करत तिशी उंबऱ्यावर येऊन ठेपली आणि समोर सगळा अंधारच दिसायला लागला.. आईबाप कंगाल झाले. उमेदीची वर्षे मातीत गेली. या भयंकर साथीच्या अळीनं त्यांची आयुष्यंच बरबाद केली. याला जबाबदार कोण? हजारात एक होत असेल अधिकारी पण या नऊशे नव्याण्णवांचे काय?
हे वास्तव नक्कीच चिंताजनक आहे. पण माझ्यामते खरी समस्या वेगळी आणि अधिक गंभीर आहे. स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली जो अभ्यास करून घेतला जातो त्याचा बहुतांश भाग हा "माहिती" या स्वरूपाचा असतो. म्हणजे अमुक एका नेत्याचे निधन कोणत्या वर्षी झाले? अमुक एक शासन पुरस्कार कोणाला मिळाला? त्यातही विद्यार्थ्याला जातीयवादी बनविणारे कित्येक प्रश्न असतात. उदा. अमुक एक जात ओबीसी वर्गात मोडते का? अमुक एक जात तमूक एका जातीच्या वरची की खालची (असा प्रश्न डायरेक्ट नव्हे तर अप्रत्यक्षरीत्या विचारलेला) सध्या मार्केटमध्ये मागणी असलेले अभ्यासक्रम म्हणजे "डेटा सायन्स”, "मशिन लर्निंग”, “आर्टिफिशियल इंटेलिजन्स" यांची त्यांना गंधवार्ताही असत नाही. जातीयवादी आणि कंपूबाजी याचा सराव झाला की कोणत्यातरी राजकीय / सामाजिक पक्षात आपोआप प्रवेश होतो आणि जीवनाची दिशाही बदलते. ही दशा मात्र खात्रीने अधोगतीकडे घेऊन जाते!

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)