२४ जून, २०१९

ऱ्य आणि ऱ्ह चा घोळ

ऱ्य काढण्याच्या दोन पद्धती आहेत.
r--y
r*y

तसेच ऱ्ह काढण्याच्या दोन.
r--h
r*h

यातील दुसरी पद्धत बरोबर असून पहिली पद्धत वापरू नये. पहिल्या पद्धतीत zero width joiner वापरला आहे. तर दुसऱ्यात नुक्ताधारी ऱ आहे. खाली दिलेले दोन्ही शब्द सारखे दिसत असले तरी गूगलमध्ये कॉपी पेस्ट केले तर वेगवेगळे रिझल्ट मिळतील.

दुसर्‍यात
दुसऱ्यात