गमभन व बहुधा बरहामध्ये फोनेटिक पद्धतीने शिवाजी हा शब्द दोन पद्धतीने लिहिता आला.
shivAjI
shivaajee
आता हा शब्द सरळ शिफ्ट न वापरता लिहिता आला नसता का?
shivaji
तो तसा लिहिता येत नाही याचे कारण आहे, स्वरांसाठी काही चाव्या राखून ठेवाव्या लागल्या आहेत. उदा.
"e" ही चावी दिली आहे ए साठी (े) पण ही चावी देता आली असती ऱ्हस्व 'इ' साठी
आणि "i" ही चावी देता आली असती दीर्घ 'ई' साठी.
'a' ही चावी देता आली असती दीर्घ आ साठी "ा".
हे बदल केले तर मला shevaji हा शिफ्ट की न वापरता लिहिता येईल आणि त्यामुळे टंकलेखनाचा वेग वाढेल.
आता अशी चाव्यांची अदलाबदल केली तर सध्या त्या चाव्यांवर असणारी अक्षरे टंकण्यास अधिक वेळ नाही का लागणार? सध्या "a e i" वर "अ ए इ" ही तीन अक्षरे आहेत. तर कॅपिटल "A E I" वर आहेत "आ अॅ ई". पण ही अक्षरे स्वर म्हणून अधिक वापरली जातात. मुळाक्षरे म्हणून नव्हे. "आ" हे अक्षर "ा" या स्वराच्या फक्त तीन टक्के वापरले जाते. आणि हे गुणोत्तर इतर स्वरांच्या बाबतीतही लागू पडते.
थोडक्यात 'शिवाजी' शब्दातील 'वा' या अक्षरात आलेल्या स्वराचे म्हणजे "ा" चे प्रमाण "आकार" या शब्दात आलेल्या "आ" च्या तुलनेत कितीतरी अधिक आहे.
http://spreadsheets.google.com/pub?key=tBJjzbcQB5i7tmfdO5Hk2DQ&output=html
प्रशांत कुलकर्णी यांनी पूर्ण नवीन लेआउट सुचविला आहे. सध्या "s h sh" वर "स ह श" ही अक्षरे येतात. याचा अर्थ श साठी दोन चाव्या वापरल्या आहेत. त्यांनी प्रत्येक अक्षरासाठी एकच चावी वापरावी लागेल अशी योजना केली आहे.
http://prashantkulkarni.blogspot.com/2010/06/blog-post.html
पण की-बोर्डवर केवळ ३३ चाव्या उपलब्ध आहेत. यावर उपाय म्हणून त्यांनी १ ते ९ अंकांच्या चाव्या देखील वापरल्या आहेत. हा उपाय म्हणजे "रोग चालेल पण डॉक्टर आवर" असे वाटेल. कारण अंकांच्या चाव्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हात कीबोर्डवरून पूर्ण उचलावा लागतो आणि पुढची अक्षरे चुकतात.
सध्याच्या गमभन/ बरहातील फोनेटिक स्वरूपातच काही बदल केल्यास टंकलेखनाचा वेग वाढेल असे मला वाटते. पण पूर्ण नवीन लेआउट सध्याच्या घडीला अनावश्यक असून त्यामुळे आहे त्या अराजकतेमध्ये भर पडेल.
०५ ऑक्टोबर, २०१०
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)