मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरणार्या ऑटो करेक्ट म्हणजे काय हे नव्याने सांगायला नको. त्यात adn असें टंकित केले की आपोआप and असे होते. अशीच सुविधा ओपन ओफ़िसमध्ये इंग्रजीसाठी देखील उपलब्ध आहे.
http://extensions.services.openoffice.org/project/EnglishAutocorrectList
मराठीसाठी स्वयंसुधारणा मनोगत वेबसाईटवर फार पूर्वीपासून उपलब्ध आहे. पण ती वापरण्यासाठी आधी इंटरनेट जोडणी हवी, मनोगतवर येण्याची नोंद करायला हवी आणि आपल्याला हवे ते शब्द आपोआप न सुधारणे अशा बर्याच त्रुटी त्यात आहेत. अर्थात ऒनलाईन व ओफ़लाईन यात तुलनाच होऊ शकत नाही. ओफलाईन टंकलेखन कधीही अधिक परिणामकारक ठरते. ओपन ओफिसच्या रायटरमध्ये टंकलेखनाला सहाय्यभूत ठरू शकतील अशा असंख्य बाबी आहेत.
मराठीत स्वयंसुधारणा (एटो करेक्ट) ही सुविधा मोफत व मुक्त स्रोत पद्धतीने वितरीत करायचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी चुकिचे शब्द व त्यासमोर योग्य शब्द अशी यादी मला हवी आहे. अशी यादी करायला मी सुरुवात केली आहे...
http://spreadsheets.google.com/ccc?key=rMJYRkasGPlEM3fyjA1gOxA
मनोगतावरील "हे शब्द असे लिहा (अं - अ)” या लेखात दिलेल्या शब्दांपासून सुरुवात केली आहे.
http://www.manogat.com/node/3176
आपल्याला वेळ होईल तसा यात अधिकाधिक शब्दांची भर घालावी अशी विनंती आहे.