मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरणार्या ऑटो करेक्ट म्हणजे काय हे नव्याने सांगायला नको. त्यात adn असें टंकित केले की आपोआप and असे होते. अशीच सुविधा ओपन ओफ़िसमध्ये इंग्रजीसाठी देखील उपलब्ध आहे.
http://extensions.services.openoffice.org/project/EnglishAutocorrectList
मराठीसाठी स्वयंसुधारणा मनोगत वेबसाईटवर फार पूर्वीपासून उपलब्ध आहे. पण ती वापरण्यासाठी आधी इंटरनेट जोडणी हवी, मनोगतवर येण्याची नोंद करायला हवी आणि आपल्याला हवे ते शब्द आपोआप न सुधारणे अशा बर्याच त्रुटी त्यात आहेत. अर्थात ऒनलाईन व ओफ़लाईन यात तुलनाच होऊ शकत नाही. ओफलाईन टंकलेखन कधीही अधिक परिणामकारक ठरते. ओपन ओफिसच्या रायटरमध्ये टंकलेखनाला सहाय्यभूत ठरू शकतील अशा असंख्य बाबी आहेत.
मराठीत स्वयंसुधारणा (एटो करेक्ट) ही सुविधा मोफत व मुक्त स्रोत पद्धतीने वितरीत करायचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी चुकिचे शब्द व त्यासमोर योग्य शब्द अशी यादी मला हवी आहे. अशी यादी करायला मी सुरुवात केली आहे...
http://spreadsheets.google.com/ccc?key=rMJYRkasGPlEM3fyjA1gOxA
मनोगतावरील "हे शब्द असे लिहा (अं - अ)” या लेखात दिलेल्या शब्दांपासून सुरुवात केली आहे.
http://www.manogat.com/node/3176
आपल्याला वेळ होईल तसा यात अधिकाधिक शब्दांची भर घालावी अशी विनंती आहे.
३० जून, २००९
०१ जून, २००९
एक लाख शब्दांचा टप्पा पूर्ण
एक लाख शब्दांचा टप्पा आज (१ जून ०९) पूर्ण झाला. सर्वांचे अभिनंदन व आभार.
http://code.google.com/p/hunspell-marathi-dictionary/
आता यात काही चुकीचे शब्द असण्याची शक्यता असल्याने ते परत एकदा तज्ज्ञांकडून तपासून घेण्यात येतील. नवीन शब्दांची भर घालण्याचे काम चालूच राहील. अधिक माहिती...
http://mr.upakram.org/node/114
http://code.google.com/p/hunspell-marathi-dictionary/
आता यात काही चुकीचे शब्द असण्याची शक्यता असल्याने ते परत एकदा तज्ज्ञांकडून तपासून घेण्यात येतील. नवीन शब्दांची भर घालण्याचे काम चालूच राहील. अधिक माहिती...
http://mr.upakram.org/node/114
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)