मराठी विकिपीडियाने काही जोडाक्षरांच्या बाबतीत आडवी मांडणी स्वीकारलेली दिसत आहे. उदा...
आडवी मांडणी । उभी मांडणी
रत्नागिरी । रत्नागिरी
मुक्त । मुक्त
आश्वासन । आश्वासन
लोकसत्तासारखी वृत्तपत्रेदेखील हे शब्द आडव्या मांडणीत दाखवतात. याचा अर्थ वाचकांची सोय ही जास्त महत्त्वाची असून संगणक लॉजिक किंवा नियम सरसकट राबवता येत नाहीत. पण तसे असेल तर अश्वारोहण हा शब्द उभ्या मांडणीत अश्वारोहण असा का लिहिला जातो? म्हणजे मराठी शब्द आडव्या मांडणीत तर संस्कृत शब्द उभ्या मांडणीत दाखवावेत असा काही संकेत आहे का? कारण माझ्यामते अश्वत्थामा बरोबर असून सहसा अश्वत्थामा असे लिहिले जात नाही. आडव्या मांडणीसाठी नॉन जॉइनर वापरावा लागतो. त्याची चर्चा मी याच धाग्यात (१ एप्रिल २०२१) केली आहे. एकच शब्द दोन पद्धतीने लिहिता येत असेल तर त्यातील एकच पद्धत स्पेलचेकमध्ये स्वीकारायची असे धोरण आहे. पण या बाबतीत अपवाद करून हे सहाही शब्द डेटाबेसमध्ये जमा करत आहे. अजून काही शब्द सुचविले गेले तर ते देखील स्वीकारता येतील.