२७ डिसेंबर, २००९
रवी रतलामी यांना मंथन पुरस्कार
छत्तीसगडी या भाषेत संपूर्ण संगणक उपलब्ध करून देण्याचं भगिरथ काम ज्यांनी केले त्या रवी रतलामी यांना यंदाचा मंथन पुरस्कार मिळाला हे लोकलायझेशनच्या क्षेत्रात काम करणार्यांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. सुमारे एक लाख स्ट्रींग्स इंग्रजीतून छत्तीसगडी या भाषेत भाषांतरित कराव्या लागल्या तेंव्हा कुठे या प्रयोगाने थोडाफार आकार घेतला. त्यांचं मूळ नाव रवीशंकर श्रीवास्तव. पण जालावर सर्वजण आपल्या ब्लॉगच्याच नावाने ओळखले जातात. ते जेव्हा रवी रतलामी या नावाने हिंदी ब्लॉग लिहीत तेव्हापासून मी त्यांचा ब्लॉग वाचत आलो आहे. पुण्यातील एका कार्यशाळेत त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचाही योग आला होता. एका निरलस, निरपेक्षपणे काम करणार्याला एक मोठा पुरस्कार मिळाला ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आता इथेच थांबतो कारण मराठीच्या के.डी.ई ची प्रगती किती असा साळसूद प्रश्न करून माझ्या चेहर्यावरचे भाव निरखण्याचा एक प्रकारचा आसूरी आनंद मी कोणालाच मिळू देणार नाही.
२६ डिसेंबर, २००९
एका जंगलाची गोष्ट
खूप पुर्वीची गोष्ट नाही. असेल काही वर्षांपूर्वीचीच. पण वाटते कित्येक युगे लोटली असतील त्याला. तर मी काय म्हणत होतो, पूर्वी एक होते जंगल. आता तुम्ही म्हणाल त्यात काय इतके, पूर्वी होतीच जंगलं खूप. आता माणसाची भूकच इतकी वाढली आहे की जंगलांना जागाच उरलेली नाही वाढायला. एका जंगलाला लागून दुसरे असे वाढत होते, आपल्याच हिशोबाने. जंगलांना काही डेडलाईन नसते की क्लाएंटची भिती. वाढायला लागली काही वर्ष तर कोणाला काय पडलीय त्याची?
तर त्या जंगलाकडे एका कुशल माळ्याचे लक्ष गेले. त्याच्या मनात फार पूर्वीपासून एक सुंदर बगिचा बनवायचे फार होते. त्याने काही विचार केला आणि कामाला लागला. प्रथम त्याने आडवीतिड्वी वाढलेली झाडे छाटून टाकली. सुंदर पायवाटा तयार केल्या. चहू बाजूंनी तटबंदी उभारली. एकच प्रवेशद्वार ठेवले येणार्या जाणार्यांवर लक्ष ठेवायला. आत आल्यावर कोणाच्याही तोंडून उद्गार निघाले पाहिजेत की वा!!
प्रवेशद्वाराशीच एक नोंदवही ठेवली. त्यात येणार्या जाणार्यांचे शेरे असत. परदेशात राहिलेल्या काही विदुषी इतक्या खूष झाल्या की म्हणाल्या "अगदी इडन गार्डनची आठवण झाली हो!" माळ्याच्या अंगावर मुठभर मास चढले.
जंगली पशू, पक्ष्यांना जंगल आणि गार्डन यातला फरक लगेच कळतो. त्यांनी हे गार्डन केव्हाच सोडले होते. जे राहिले ते रिंगमास्तरकडे बघून दिवस काढू लागले. हे जंगल होते, आहे आणि राहू द्या असे म्हणणार्यांच्या बाबतीत माळीकाका "हे दयाळू ईश्वरा या निर्बुद्धांना क्षमा कर ते काय बोलत आहेत ते त्यांचे त्यांना समजत नाही." अशी प्रार्थना करीत. त्यांच्या मनात कोणाबद्दलही काही आकस नव्हताच.
जंगलांचे नियम वेगळे असतात. त्यात एक जीव प्रसंगी दुसर्याला खाऊन जगतो. झाडांना बंधन नसते कसे वाढायचे. गायी गुरांच्या जाण्या येण्याच्या वाटेला पायवाट म्हणायचे झाले. तेथे निसर्ग हाच माळी असतो. तज्ज्ञ माळ्याची गरज असते ती बागेला. माणसाला बाग आणि जंगल दोन्ही हवे असते, आहे. हे जंगल असेच राहू द्या. उन्हाने, दुष्काळाने वाळले तरी बिया असतातच कुठेतरी पडलेल्या. त्या उमलतील पुढच्या काळात. पुढच्या पिढ्यांना कधीच न चाखलेली फळ खायला मिळतील करवंदासारखी. कारण त्यांची पैदास बागेत थो़डीच होते?
या लेखात वर्णन केलेल्या बागेचे मराठी विकिपीडियाशी जर साम्य दिसले तर तो एक निव्वळ योगायोग समजावा.

२५ डिसेंबर, २००९
पद्धत की पध्दत
वर दिलेल्यापैकी पहिला शब्द बरोबर आहे तर दुसरा चुकीचा. पण गुगल सर्च केला असता दोन्हीसाठी एक लाखापेक्षा अधिक रिझल्ट्स मिळतात. शुद्धलेखन किती गंभीर स्वरूप धारण करत आहे यासाठी हे एक उदाहरण पुरेसे आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)